साक्षी गांधीने तब्बल 8 किलो वजन कसं कमी केलं?; या टीप्स तुम्हालाही उपयोगी पडतील
Actress Sakshee Gandhi Weight Loss Journey : अनेकदा सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वजन वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा आपण ओव्हर वेट होतो. मग प्रश्न पडतो की वजन कसं कमी करावं? यासाठी योग्य डाएट आणि व्यायाम केल्याने तुमचं वजन कमी होऊ शकतं. वाचा सविस्तर...
1 / 5
वाढतं वजन हे सध्या अनेकांची समस्या आहे. पण वजन संतुलित कसं ठेवावं? वाढलेलं वजन कमी कसं करावं? हे अनेकदा लक्षात येत नाही. अभिनेत्री साक्षी गांधी हिने या सगळ्यावर भाष्य केलंय.
2 / 5
अभिनेत्री साक्षी गांधी हिने तिची वेट लॉस जर्नी शेअर केली आहे. आठ किलो वजन साक्षीने कमी केलं आहे. रोजच्या जेवणात थोडा बदल आणि जेवणाची वेळ यात बदल केल्याने वजन कमी होण्यास मदत झाल्याचं साक्षीने सांगितलं आहे.
3 / 5
मी ट्रेनरच्या सांगण्यावरून माझ्या सवयींमध्ये बदल केला. सगळ्यात आधी तर मी जेवणातील साखर कमी केली. अगदी आठवड्यातून एखादवेळेला मी गोड काही खाते. यामुळे शरिरात सकारात्मक बदल झाले आहेत. याशिवाय भात खाणं मी टाळते. हेल्थी फूड खाते, असं साक्षीने सांगितलं.
4 / 5
जेवणात काय खायचं याच सोबत कोणत्या वेळेला आपण जेवतो ते देखील महत्वाचं आहे. मी दिवस मावळल्यानंतर काही खात नाही. रात्री उशीरा काही खास नाही. यामुळे माझं आठ किलो वजन कमी केलं आहे, असं साक्षीने सांगितलं.
5 / 5
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अवनी ही भूमिका तिने साकारली आहे. तर सन मराठीवरच्या नवी जन्मेन मी या मालिकेत साक्षी सध्या काम करते आहे. या मालिकेत संचिता हे पात्र ती साकारले आहे.