मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
Aww-Fishily Engaged!, म्हणत शिवानी सुर्वेने साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देवयानी या मालिकेतून शिवानी सुर्वे घराघरात पोहोचली. झिम्मा 2 हा तिचा सिनेमाही काहीच दिवसांआधी आला. शिवानीचा मोठा चाहतावर्ग आहे.
तर अजिंक्य ननावरे हा झी मराठीवरच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सध्या काम करतोय. याआधीही मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलेलं आहे.
शिवानी आणि अजिंक्य या दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलंय. सदिच्छा दिल्या आहेत.