‘चला हवा येऊ द्या’ची टीम पुन्हा एकत्र दिसणार?; श्रेया बुगडे म्हणाली, दीड-दोन महिन्यात…

| Updated on: Jul 14, 2024 | 12:57 PM

Actress Shreya Bugde on Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. या कॉमेडी रिअॅलिटी शोमधील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. पण आता हा कार्यक्रम काही बंद झाला आहे. हे कलाकार पुन्हा एकत्र दिसणार का? यावर श्रेया बुगडे हिने भाष्य केलंय.

1 / 5
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोने सलग 10 वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. हा कार्यक्रम टीव्हीवर लागला की महाराष्ट्राच्या घराघरात हास्य लहरी उमटायच्या. या कार्यकक्रमाने 10 वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

2 / 5
'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार प्रेक्षकांना आपल्या घरचे सदस्य वाटायचे. हा कार्यक्रम थांबवत असल्याचं झी मराठीने जाहीर केल्यानंतर प्रेक्षकांचा हिरमोड झाला. पण ही 'चला हवा येऊ द्या'ची टीम पुन्हा एकत्र पाहायला मिळणार का? यावर अभिनेत्री श्रेया बुगडे हिने भाष्य केलं आहे.

3 / 5
एका मुलाखती दरम्यान श्रेयाला 'चला हवा येऊ द्या'ची टीम पुन्हा एकत्र दिसू शकते का? असं विचारण्यात आलं. तेव्हा पुढच्या दीड- दोन महिन्यामध्ये नवीन काहीतरी करू. पण मला खात्री आहे की, तसं प्लॅनिंग आहे. त्यामुळे लवकरच याबद्दल तुम्हा सगळ्यांना कळेलच, असं श्रेया म्हणाली.

4 / 5
श्रेया बुगडे हिने 'चला हवा येऊ द्या'मध्ये साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. तिने 'चला हवा येऊ द्या'मध्ये साकारलेली फुलराणी आजही प्रेक्षकांना भावते. शिवाय अनेक अभिनेत्रींची मिमिक्रीदेखील श्रेयाने केली आहे.

5 / 5
श्रेया बुगडे सध्या 'ड्रामा ज्युनिअर्स' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. 'ड्रामा ज्युनिअर्स' या कार्यक्रमाची ती सूत्रसंचालक आहे. तिचं कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही तिच्या चाहत्यांना आवडतं आहे.