प्रसिद्ध अभिनेत्रीने परदेशात सुरु केला नवा व्यवसाय; मिळवलं प्रचंड यश…
Actress Uma Hrishikesh U MAtter Youtube Channel : प्रसिद्ध अभिनेत्री उमा ऋषिकेश हिने परदेशात जात नवा व्यवसाय सुरु केला. यात तिने भरघोस यश मिळवलं आहे. सोशल मीडियावर उमाने ही आनंदाही बाब शेअर केलीय. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाचा सविस्तर...
1 / 5
अभिनेत्री उमा ऋषिकेश... मराठी मालिका विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री... उमा काही दिवसांआधी परदेशात स्थायिक झाली. उमा सध्या न्युझिलंडमध्ये राहते.
2 / 5
परदेशात राहायला लागल्यानंतर उमाने एक नवा व्यवसाय सुरु केला. उमाने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु केलं. U MAtter या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तिने नवनव्या विषयाशी संबंधित व्हीडिओ शेअर करणं सुरू केलं.
3 / 5
लाईफस्टाईल, स्किन केअरच्या उमाच्या व्हीडिओंना नेटकऱ्यांनी पसंती दिली. अभिनेत्री असल्यामुळे तिचा एक चाहता वर्ग होताच. शिवाय उमाच्या या खास स्किन केअरच्या व्हीडिओमुळे नेटकऱ्यांनी तिचे व्हीडिओ पाहण्यावर भर दिला.
4 / 5
आता उमाच्या यूट्यूब चॅनेलने मैलाचा टप्पा गाठला आहे. उमाच्या U MAtter या यूट्यूब चॅनेलने एक लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे यूट्यूबने तिला सिल्व्हर यूट्यूब प्ले बटन दिलं आहे.
5 / 5
ही आनंदाची बाब उमाने सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिलीय. शिवाय तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. 'योग योगेश्वर जयशंकर' या मालिकेत उमाने पार्वती हे पात्र साकारलं होतं.