Adipurush AI Cast : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील पात्रावरून वाद सुरु असताना एआयने करून दाखवलं, पाहा फोटो

| Updated on: Jun 20, 2023 | 7:26 PM

Adipurush AI Cast Photos : आदिपुरुष चित्रपटातील संवाद, पात्र आणि ग्राफिक्सवरून सध्या जोरदार वाद सुरु आहे. सोशल मीडियावर तर वाभाडे काढले जात आहेत. असं असताना एआयने चित्रपटातील पात्रांचे तयार केलेले काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून नेटकरी म्हणाले खरी पात्र अशीच असायला हवीत.

1 / 6
आदिपुरुष चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. मात्र या चित्रपटावरून बराच वाद रंगला आहे. संवाद आणि पात्र यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कलाकारांचे संवाद, गेटअप, व्हीएफएक्स यावरून टीका होत आहे. त्यात टपोरी डायलॉगमुळे मनोज मुंतशिर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. या दरम्यान एआयने आदिपुरुष चित्रपटातील काही फोटो तयार केले आहेत. हे फोटो पाहून नेटकरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. इतकंच काय तर ही पात्र खरी वाटतात असं सांगितलं आहे. Image Source: Twitter/@DealsDhamaka

2 / 6
चित्रपटातील मुख्य पात्र हे भगवान रामाचं असून प्रभासने ते साकारलं आहे. मात्र चित्रपटातील त्याचा लूक प्रेक्षकांना आवडला नाही. काही जणांनी त्यावर टीकाही केली आहे. चित्रपटात मिश्या असलेला राम लोकांना भावला नाही. पण एआयच्या नजरेतून शाहित नावाच्या कलाकाराने केलेलं चित्रण लोकांना भावलं आहे. Image Source: Instagram/@sahixd

3 / 6
हनुमंताचं पात्र साकारणाऱ्या देवदत्त नागेचा लूकही प्रेक्षकांना आवडला नाही. खासकरून टपोरी स्टाइल संवाद लोकांना झिडकारून लावले आहेत. मात्र एआयने साकारलेलं रुप लोकांना भावलं आहे. Image Source: Instagram/@sahixd

4 / 6
चित्रपट रीलीज होण्यापूर्वीच सैफ अली खानच्या रावणावर लोकांनी टीका केली होती. त्यामुळे तेव्हा काही बदल करण्यात आले होते. मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतरही लोकांना रावणचं पात्र आणि गेटअप आवडलं नाही. पण एआयने साकारलेला रावण लोकांना आवडलेला दिसत आहे. Image Source: Instagram/@sahixd

5 / 6
चित्रपटात सनी सिंह याने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सनी आपली छाप सोडू शकला नाही. पण आदिपुरुष चित्रपटातील लक्ष्मणचं एआय वर्जन लोकांना चांगलं वाटलं. Image Source: Instagram/@sahixd

6 / 6
कलाकार शाहिदने एआयच्या मदतीने सीतेचं पात्रही साकारलं आहे. कृति सेननला सीतेच्या रुपात दाखवत लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिची ही छबी पाहून नेटकरी म्हणाले खऱ्या अर्थाने सीता वाटत आहे. Image Source: Instagram/@sahixd