Adipurush : मनोज मुंतशिर शुक्ला यांच्यापेक्षा ChatGPT ने लिहिले चांगले डायलॉग! वाचा काय ते
आदिपुरुष चित्रपट रिलीज झाला असून या ना त्या कारणावरून वाद सुरुच आहे. चित्रपटातील पात्र, व्हीएफएक्स, संवाद यावर टीका होत आहे. या दरम्यान एआयने काही पात्र साकारली होती. आता ChatGPT ने डायलॉग लिहिले आहेत. हे डायलॉग वाचून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
1 / 7
आदिपुरुष चित्रपट रामायणावर आधारित आहेत. या चित्रपटात रामाच्या भूमिके प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. (PC: TV9)
2 / 7
आदिपुरुष चित्रपटाचे संवाद मनोज मुंतशिर शुक्ला यांनी लिहिले आहेत. चित्रपटात "कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का और जलेगी तेरे बाप की" असे विचित्र संवाद आहेत. (PC: TV9)
3 / 7
चॅट जीपीटीद्वारे आदिपुरुष चित्रपटाचे काही संवाद लिहिण्यात आले आहेत. चॅटबॉटच्या मते हे डायलॉग त्याने स्वत: लिहिले आहे. यापैकी काही डायलॉग तुम्ही वाचू शकता. (PC: TV9)
4 / 7
चॅट जीपीटीने लिहिलेले डायलॉग राम, लक्ष्मण, हनुमान आणि विभीषण या पात्रांशी जुळून येत आहेत. हे डायलॉग वाचून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून कौतुक केलं आहे. (PC: TV9)
5 / 7
आदिपुरुष चित्रपटावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. खासकरून भाषा शैलीवर निशाणा साधला जात आहे. (PC: TV9)
6 / 7
मनोज मुंतशिर शुक्ला यांनी नुकतंच सांगितलं आहे की, या चित्रपटातील काही वादग्रस्त संवाद पुन्हा लिहिणार आहे. पण किती संवाद बदलले जातील याबाबत खुलासा केलेला नाही. (PC: TV9)
7 / 7
मनोज मुंतशिर शुक्ला डायलॉग ठिक करतील तेव्हा करतील. पण चॅट जीपीटी आदिपुरुष चित्रपटाचे डायलॉग दुरुस्त करू शकतो. चॅटबॉट सध्या फुकट असून तुम्ही प्रयत्न करू शकता. (PC: TV9)