सणसणीत दोन कानाखाली द्याव्या…; ‘कोकण हार्टेड गर्ल’ आणि ‘छोटा पुढारी’ यांच्यात टोकाचा वाद
Ankita Prabhu Walawalkar and Ghanshyam Darade Argument : बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांमध्ये वारंवार वाद झाल्याचं पाहायला मिळतं. आता 'कोकण हार्टेड गर्ल' आणि 'छोटा पुढारी' यांच्यात वाद झाल्याचं दिसतं आहे. बिग बॉसच्या घरात नेमकं काय झालं? वाचा सविस्तर...
1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. हे चिमुकले पाहुणे घरातील सर्व सदस्यांना आपल्या तालावर नाचवताना दिसत आहेत. अशातच बिग बॉसच्या घरात वादाला तोंड फुटलं आहे.
2 / 5
कलर्स मराठीकडून 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात चिमुकल्या पाहुण्यांसोबत घरातील 'छोटा पुढारी'देखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे. 'छोटा पुढारी'च्या पंग्यामुळे घरात चांगलाच दंगा होणार आहे.
3 / 5
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता आणि धनंजय पोवार घन:श्यामबद्दल बोलताना दिसत आहे. अंकिता त्याला सांगते की, 'घन:श्यामला खरचं मला मारावसं वाटत होतं... त्याच्या एका शब्दावरही मला विश्वास राहिलेला नाही. त्याला धावताना पाहून त्याच्या दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा वाटत होत्या'.
4 / 5
घन:श्यामने 'बिग बॉस मराठी'च्या घरात काय कल्ला केलाय? हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. नक्की कशावरून या दोघांमध्ये वाद झालाय? अंकिता का चिडली आहे? हे आज कळणार आहे.
5 / 5
'बिग बॉस मराठी'चा तिसरा आठवडा आहे. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळणार आहेत. कॅप्टन्सीचा गेम कोण जिंकतं? बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन कोण होतं? हे पाहावं लागणार आहे.