‘बिग बॉस मराठी’च्या घरात जोरदार राडा…; घरातील सदस्य भिडले
Bigg Boss Marathi Video : बिग बॉसच्या घरात जोरदार राडा झाला आहे. ए टीम आणि बी टीममधील सदस्य भिडले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात ‘बिग बॉस मराठी’ घरात जोरदार राडा झाल्याचं दिसत आहे. नेमकं काय झालं? का झाला हा राडा? पाहा फोटो...
1 / 5
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. दोन्ही टीम एकमेकांमध्ये भिडले आहेत.
2 / 5
‘बिग बॉस मराठी’बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. आज बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा करताना दिसत आहेत.
3 / 5
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात सदस्य बी बी फार्ममध्ये राडा करताना दिसणार आहेत. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला करणार आहेत. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे.
4 / 5
'बिग बॉस मराठी'च्या या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत. त्यांचा हा राडा रसिकांचं मात्र मनोरंजन करेल. या राड्याची सोशल मीडियावर देखील चर्चा होत आहे.
5 / 5
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.