बिग बॉसच्या घरात कुणी बांधली सूरज चव्हाणला राखी?; पाहा फोटो…
Bigg Boss Marathi House Rakshabandhan : बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आज रक्षाबंधन आहे. त्यानिमित्त बिग बॉस मराठीच्या घरातही रक्षाबंधन साजरं करण्यात येतंय. गुलिगत सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरात राखी बांधण्यात आली. कुणी बांधली ही राखी? वाचा...
1 / 5
बिग बॉस मराठी'च्या या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात आहे. त्याचा साधेपणा आणि त्याचा खेळ प्रेक्षकांना आवडतो आहे. सोशल मिडियावर सूरजच्या समर्थनार्थ अनेकजण पोस्ट शेअर करत आहेत.
2 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज 'अबीर गुलाल' या मालिकेची टीम आली होती. 'अबीर गुलाल' अगस्त्य अर्थात अभिनेता अक्षय केळकर, शुभ्रा- अभिनेत्री गायत्री दातार आणि श्री म्हणजेच पायल जाधव या कलाकारांनी सदस्यांसोबत धमाल केली. यावेळी रक्षाबंधनही साजरं झालं.
3 / 5
'अबीर गुलाल' या मालिकेत 'श्री' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पायल जाधव हिने सूरज चव्हाणला राखी बांधली. सूरज तुझ्यासाठी खास गिफ्ट आणलं आहे. तुझ्या पाचही बहिणींच्या वतीने मी तुला राखी बांधतेय, असं पायल म्हणाली.
4 / 5
तू ज्या परिस्थितीतून इथं आला आहे, तिथून येऊन इथं टिकून राहणं कठीण आहे. पण तू ते करतो आहेस. सूरज मला तुझा खूप अभिमान आहे, असं म्हणत पायलने सूरजला राखी बांधली. यावेळी सूरज पायलच्या पाया पडला. तर या दोघा बहिण- भावांनी प्रेमाची मिठी देखील मारली.
5 / 5
अक्षय केळकर हा 'बिग बॉस मराठी' च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता आहे. तर गायत्री दातारही तिसऱ्या सिझनमधील स्पर्धक आहे. या दोघांनीही 'बिग बॉस मराठी' च्या घरातील सदस्यांना काही खास टिप्स दिल्या.