‘बिग बॉस मराठी’च्या घरात होतंय कॅप्टनसी कार्य; कोण जिंकणार टास्क?
Bigg Boss Marathi House Captaincy Kary : बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंग चढू लागला आहे. दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या कॅप्टनसी कार्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बिग बॉसच्या घरात काय घडतंय? वाचा सविस्तर...
1 / 5
'बिग बॉस मराठी' चा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यातील कॅप्टनसी कार्य पार पडतं आहे. या कार्याची तयारी आणि प्लॅनिंग 'बिग बॉस मराठी' च्या घरात पाहायला मिळत आहे.
2 / 5
'बिग बॉस मराठी' च्या घरात आज 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. पहिल्या 'कॅप्टनसी टास्क'दरम्यान घरातील सदस्य प्लॅनिंग करताना दिसणार आहेत.
3 / 5
'कॅप्टनसी'च्या सीटचा प्रश्न असल्याने घरातील सदस्य कमाल गेम प्लॅन बनवताना दिसत आहेत. कॅप्टनसीसाठी अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीचे एकमेकांसाठी वेगळे प्लॅन आहेत. तर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकरदेखील तिचा प्लॅन ठरवताना दिसत आहे.
4 / 5
अरबाज आणि निक्की कॅप्टनसीसाठी निखिलचा सपोर्ट मागताना दिसत आहे. तर निखिलदेखील अरबाजला फुल ऑन सपोर्ट करायला तयार होतो. एकंदरीतच पहिल्याच टास्कदरम्यान घरात धमाका होणार असल्याचंच चित्र प्रोमोतून दिसत आहे.
5 / 5
'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' या टास्क दरम्यान घरात सूरज आणि वैभवमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळेल. 'दम असेल तर मला हात लावून दाखव', असं वैभव सूरजला म्हणतो. पण इरिना मात्र सूरजला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. आता कार्य कोण जिंकणार? घराचा कॅप्टन कोण होणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.