टिश्यूवरून इश्यू…; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगलाय टिश्यू पेपरवरुन वाद... 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य करत आहेत एकमेकांवर कुरघोडी... नेमकं काय घडतंय? रितेश भाऊ सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता... आज विकेंड विशेष भागात रकाय घडणार? वाचा सविस्तर...
1 / 5
बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही. आज घरात शुल्लक टिश्यू पेपरवरुन वाद रंगलेला पाहायला मिळणार आहे. हा वाद आता चांगलाच चर्चेत आलाय.
2 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य एकमेकांवर कुरघोडी करताना दिसणार आहेत. प्रेक्षकांना मात्र त्यांच्यातील रंगलेला हा वाद पाहताना मजा येणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांच्या कुरघोडी करताना दिसत आहेत.
3 / 5
'बिग बॉस मराठी'चा प्रोमो समोर आला आहे. यात निक्की म्हणतेय,"आम्हाला टिश्यू दिसला तर आम्ही तसचं ठेऊ." त्यावर अरबाज उत्तर देतो. निक्कीने उचलला तर त्यात कमीपणा नाही आहे, असं तो म्हणतो.
4 / 5
अभिजीत म्हणतो,"एकमेकांच्या कुरघोड्या करू नका". अभिजीतला उत्तर डीपी दादा देतो. आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही. निक्की आता चुकतेय असं तुला वाटत नाही का?, असं डीपी म्हणतो. जे चुकत आहेत त्यांनी स्वत: समजावं, अभिजीत म्हणतो. यावर असं असेल तर प्रत्येकाने आपलं आपलं काम स्वत: करा, असं निक्की उत्तर देते.
5 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आता विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ड्रामा पाहणं इतरांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे.