पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नबंधनात; पाहा खास फोटो…

| Updated on: Mar 16, 2024 | 3:35 PM

Bollywood actor Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding Photos and Lovestory : अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नबंधनात... या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसंच भावी जीवनासाठी सदिच्छा दिल्या जात आहेत. पुलकित आणि क्रितीच्या लग्नाचे खास फोटो, पाहा...

1 / 5
मुंबई | 16 मार्च 2024 : अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. राजधानी दिल्लीतील ITC ग्रँड हॉटेलमध्ये पुलकित आणि क्रितीचं अलिशान लग्न पार पडलं आहे. या लग्न सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

2 / 5
लग्नासाठी दोघांनी खास डिझायनर आऊटफिट परिधान केले होते. क्रितीने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता. तर पुलकितने लाईट ग्रीन कलरची शेरवानी घातली होती. या दोघांचं अनेकांनी अभिनंदन केलं. तसंच त्यांना चाहत्यांनी सदिच्छा दिल्या आहेत.

3 / 5
खोल निळ्या आकाशापासून पहाटेच्या दवापर्यंत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत... तो फक्त तू आहेस.  जेव्हा माझं हृदय धडधडतं. तेव्हा ते तुझं तिथं असणं आवश्यक आहे, असं म्हणत या क्रितीने लग्नाचे खास फोटो शेअर केलेत.

4 / 5
‘पागलपंती’ या सिनेमात काम करताना हे दोघे एकमेकांना डेट करू लागले. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. पुलकित आणि क्रितीनं दोघांनी ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘ताईश’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

5 / 5
 पुलकितचं हे दुसरं लग्न आहे. याआधी अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत पुलकितने लग्न केलं होतं. 11 महिन्यांतच दोघं विभक्त झाले. तसंच पुलकितचं नाव अभिनेत्री यामी गौतमसोबतही जोडलं गेलं होतं.