बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बॉलिवूडची क्यूट गर्ल अशी तिची ओळख आहे. वॉन्टेड या सिनेमाने तिला वेगळी ओळख दिली.
तिने ‘टार्झन-द वंडर कार’, दे ताली, संडे, फूल अॅण्ड फायनल, नो स्मोकिंग, सलाम-ए-इश्क, डोर, शादी से पहले, यूँ होता तो क्या होता,होम डिलिव्हरी, शादी नंबर वन, या सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मात्र मागच्या काही काळापासून आयेशा बॉलिवूड पासून दूर आहे.
आयेशाने 2009 मध्ये सपाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केलं. आयेशा आणि फरहानने लग्नाच्याआधी 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते.
आयेशा आणि फरहान यांना 2013मध्ये मुलगा झाला. मिखाईल आझमी असं त्याचं नाव आहे. आयेशा आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर काही काळानंतर आयेशाने तिचे काही नवे फोटो शेअर केले. तेव्हा तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचं समोर आलं. पण यामुळे तिच्या चेहऱ्यात मोठा बदल झाला. तिचे ओठ विचित्र दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. मात्र, आपली सर्जरी झाली नसल्याचा दावा आयेशा कायम करत असते.