बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या करिअरची सुरूवात अबोध या सिनेमापासून झाली. या सिनेमात तिने गौरी हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर आवारा बापमध्ये तिने काम केलं.
त्यानंतर तेजाब, वर्दी, राम कखन, प्रेम प्रतिज्ञा, किशन कन्हैया या सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारल्या. पुढे आलेल्या दिल सिनेमात तिने मधू मेहरा हे पात्र साकारलं त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
सैलाब, प्यार का देवता, प्रतिकार, साजन यासारखे तिचे सिनेमे आले. मग आला बेटा सिनेमा ज्याने माधुरी दिक्षितला वेगळी ओळख दिली. या सिनेमातील धकधक करने लगा या गाण्याने माधुरी बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख दिली. या भूमिकेसाठीही तिला फिल्म फेअर अॅवॉर्ड मिळाला.
मग माधुरीने धारावी सिनेमा ड्रीम गर्ल साकारली. पुढे खलनायक, हम आपके है कौन, याराना, कोयला, दिल तो पागल है, छोटे मिया बडे मिया, ये रास्ते है प्यार के या सारखे सिनेमे तिने केले. यानंतर आलेल्या देवदासने तर सिने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला तो ाज तागायत. यातली तिची चंद्रमुखी ही भूमिका विशेष लक्षात राहिली.
बॉलिवूडमध्ये एवढं काम करत असताना, मूळची मराठी असणाऱ्या माधुरीने मराठी सिनेमात काम केलं नव्हतं. बकेट लिस्ट हा अलिकडेच आलेला तिचा पहिला मराठी सिनेमा. तर अश्या या धकधक गर्लाला टीव्ही 9 मराठीकडूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा!