मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : तापसी पन्नू... बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री... तिच्या कामामुळे सिने रसिकांवर तिने तिची वेगळी छाप सोडली आहे. तापसीच्या लूक्सचीही जोरदार चर्चा होत असते.
तापसीच्या खासगी आयुष्याबाबत बी टाऊनमध्ये चर्चा आहे. तापसी पन्नू लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा होतेय. तिच्या बॉयफ्रेंडसोबत तापसी लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे.
मॅथियास बोई या प्रसिद्ध अॅथलिट आहे. मॅथियास हा युरोपातील डेन्मार्कचा आहे. बो बॅडमिंटनपटू आहे. 2020 ला तो निवृत्त झाला आहे. बॅडमिंटन विश्वात मॅथियासचं मोठं नाव आहे.
गेली दहा वर्षे मॅथियास आणि तापसी एकमेकांना डेट करत आहेत. तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच काळात या दोघांची भेट झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
मागच्या 10 वर्षांपासून गे दोघे एकमेकांना ओळखतात. मार्च महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे. कुटुंबीय आणि मोजके नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघे लग्नगाठ बांधणार आहेत.