Article 370 या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा नुकतंच रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.
Article 370 सिनेमातील यामी गौतमच्या कामाचं कौतुक होतंय. पण या सिनेमात यामीसोबत एक मराठी चेहराही दिसतो.
यामीसोबत Article 370 सिनेमात दिसणारा हा मराठी चेहरा म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादी... यश चौहान हे पात्र वैभवने साकारलं आहे.
Article 370 सिनेमाला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाला प्रेक्षक गर्दी करत आहेत. वैभवने साकारलेल्या यश या पात्राचंही प्रचंड कौतुक होतंय.
एक पात्र जे नेहमी माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहील. तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय, अशी पोस्ट वैभवने शेअर केलीय. वैभवने प्रेक्षकांचे आभार मानलेत.