Gadar : गदर चित्रपटासाठी अशी झाली होती अमिषा पटेलची निवड, जाणून घ्या
गदर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. लगान चित्रपट एकत्र रिलीज झाला होता. तरी लोकांनी गदर चित्रपटाला पसंती. अभिनेत्री अमिषा पटेल आणि सनी देओल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.
1 / 7
गदर चित्रपटाच्या यशानंतर आता पुन्हा एकदा गदर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात चित्रपटातही सनी देओल आणि अमिषा पटेल ही सुपरहीट जोडी दिसणार आहे.
2 / 7
अमिषा पटेल हीने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. मात्र गदर चित्रपटातील सकीना हे पात्र चाहत्यांच्या कायमच लक्षात राहीलं आहे.
3 / 7
22 वर्षानंतर पुन्हा एकदा गदर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इतक्या वर्षानंतरही चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
4 / 7
तुम्हाला माहिती आहे का? सकीनाच्या भूमिकेसाठी अमिषा पटेल ही पहिली पसंती नव्हती. तिच्या आधी ही भूमिका अनेक अभिनेत्रींना ऑफर केली होती.
5 / 7
फिल्म डायरेक्टर अनिल शर्मा यांनी सांगितलं की, सकिनाच्या पात्रासाठी 400 मुलींचं ऑडिशन घेण्यात आलं होतं. त्यानंतर अमिषा पटेलला हा रोल मिळाला.
6 / 7
या रोलसाठी काजोलला देखील ऑफर देण्यात आली होती. पण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गुंतली असल्याने तिने या चित्रपटाला नकार दिला होता.
7 / 7
22 वर्षानंतर पुन्हा एकदा गदर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 11 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.