कोट्यवधींची कमाई करूनही हे बॉलिवूड स्टार मुंबईत राहतात भाड्याच्या घरात, नाव वाचून बसेल धक्का
मुंबई हे शहर स्वप्नांचं शहर आहे. मायानगरीत अनेक जण स्वप्न उराशी बाळगून येतात. अनेकांची स्वप्न पूर्णही होतात. पण बॉलिवूडमध्ये कोट्यवधींची कमाई करूनही काही स्टार भाड्याच्या घरात हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
1 / 8
मुंबईत शाहरूख खानचा बंगला मन्नत, अमिताभ बच्चना यांचा जलसा आणि सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. चाहते त्यांच्या लाडक्या अभिनेत्यांची एक झलक पाहण्यासाठी घराबाहेर गर्दी करतात.
2 / 8
मायानगरी मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेणं वाटतं तितकं सोपं नाही. रियल इस्टेटमधील घराच्या किमती पाहून तुम्हालाही याची जाणीव आहे. त्यामुळे अनेक जण भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. यात कोट्यवधीची कमाई करणारे बॉलिवूड स्टारही मागे नाहीत.
3 / 8
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अमेरिकेतून भारतात आल्यानंतर काही वर्षे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहात होती. यासाठी महिन्यााकाठी 12.5 लाख भरत होती. नुकतंच माधुरीने लोअर परळ भागात 48 कोटींचा प्लॅट विकत घेतला आहे.
4 / 8
क्रिति सेनन जुहूमधील डुप्लेक्समध्ये भाड्याने राहते. विशेष म्हणजे घराचे मालक अमिताभ बच्चन आहेत. यासाठी ती महिन्यासाठी 10 लाखांचं भाडं भरते. तसेच 60 लाख रुपये डिपॉझिट केले आहेत.
5 / 8
जॅकलीन फर्नांडिसही मुंबईत भाड्याच्या प्लॅटमध्ये राहते. यासाठी ती महिनाकाठी 6.78 लाख रुपये भरत होती. मात्र नुकताच तिने बांद्रामध्ये फ्लॅट विकत घेतला असून त्याची किंमत 12 कोटी रुपये आहे.
6 / 8
विक्की कौशल आणि त्याची पत्नी कतरिना कैफ हे दोघंही घरासाठी भाडं मोजतात. दोघांनी लग्नानंतर जुहूमध्ये भाड्याने घर घेतलं आहे. यासाठी ते प्रति महिना 8 लाख रुपये देतात. यासाठी त्यांनी 1.75 कोटी डिपॉझिट केलं आहे.
7 / 8
आयुष्मान खुराना हे बॉलिवूडमधील स्टार आहे. विक्की डोनर चित्रपटातून त्याने आपल्या कामाची छाप सोडली आहे. त्याची कमाईही कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र मुंबईतील अंधेरीत राहणारा आयुष्मान महिन्याला 4.25 लाख भाडं भरायचा. मात्र आता त्याने मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले आहेत.
8 / 8
कार्तिक आर्यन याने मुंबईत 17.50 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. यापूर्वी तो भाड्याच्या घरात राहात होता. यासाठी तो 7.5 लाख रुपये मोजत होता. हा फ्लॅट शाहिद कपूरचा होता आणि त्याची किंमत 30 कोटी रुपये सांगितली जाते.