Happy Birthday Anas Rashid | ‘दिया और बाती हम’चा ‘सूरज’ बनून जिंकली प्रेक्षकांची मनं, आता शेतीत रमून सुखी आयुष्य जगतोय अनस रशीद

| Updated on: Aug 31, 2021 | 7:30 AM

सुपरस्टार बनण्याचे स्वप्न घेऊन हजारो लोक मुंबईत येतात. अनेकांचं हे स्वप्न खूप लवकर पूर्ण होतं, तर काहींना दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर यश मिळतं. अभिनेता अनस रशीद (Anas Rashid) सुद्धा अशा कलाकारांपैकीच एक आहे, ज्याने ‘दिया औंर बाती हम’ मालिकेद्वारे घराघरात नाव कमावलं.

1 / 6
सुपरस्टार बनण्याचे स्वप्न घेऊन हजारो लोक मुंबईत येतात. अनेकांचं हे स्वप्न खूप लवकर पूर्ण होतं, तर काहींना दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर यश मिळतं. अभिनेता अनस रशीद (Anas Rashid) सुद्धा अशा कलाकारांपैकीच एक आहे, ज्याने ‘दिया औंर बाती हम’ मालिकेद्वारे घराघरात नाव कमावलं. मात्र आता त्यानं इंडस्ट्री अलविदा म्हटलं आहे.

2 / 6
अभिनेता अनस रशीद आज (31 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अनस नेहमीच त्याच्या निरागसतेसाठी ओळखला जातो. त्यानं 2004 मध्ये ‘मिस्टर पंजाब’ हा अवॉर्ड जिंकून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘मिस्टर पंजाब’ हा अवॉर्ड जिंकल्यानंतर त्यानं टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला.

3 / 6
‘मिस्टर पंजाब’ जिंकल्यानंतर अनसनं आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2007 मध्ये ‘कहीं तो होगा’ या मालिकेद्वारे केली. या शोमध्ये त्यानं कार्तिक अहलुवालियाची भूमिका साकारली होती. यानंतर त्यानं ‘क्या होगा निम्मो का’, ‘ऐसे करो ना वादा’, ‘पृथ्वीराज’ या सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं.

4 / 6
अनसनं ‘दिया औंर बाती हम’ या मालिकेतही काम केलं. या मालिकेत अनसनं ‘सूरज राठी’ची भूमिका साकारली होती. या शोमुळे त्याला घराघरात स्वत:ची वेगळी ओळख मिळाली.

5 / 6
अनसनं 2017 मध्ये त्याच्यापेक्षा 14 वर्ष लहान हिना इकबालशी लग्न केलं. दोघांनी लुधियानामध्ये लग्न केलं होतं. अनसनं हिनाला लग्नाबद्दल विचारलं असता तिनं सांगितले की, वयामुळे तिला काही फरक पडत नाही.

6 / 6
टीव्ही इंडस्ट्रीला निरोप देऊन अनस आपल्या गावी मालेरकोटला गेला आहे. त्याला इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन 5 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की आता तो शेतकरी झाला आहे आणि त्याला शेतीत आनंद मिळतोय.