'बिग बॉस 14' ची विजेती अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर विविध फोटो ती शेअर करत असते. आताही तिने तिचे असेच हटके फोटो शेअर केले आहेत.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय असलेल्या रुबिना दिलैकने तिच्या इन्स्टाग्रामवरून वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
या फोटोंना तिने "आपण शिकणं कधीही थांबत नाही", असं कॅप्शन दिलं आहे. त्यावर लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडतोय.
रूबिनाच्या या फोटोंना 1 लाख 75 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर हजारो लोकांनी कमेंट करत तिच्या फिटनेसचं कौतुक केलंय.
रुबिना दिलैक लवकरच रोहित शेट्टीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' मध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस 14' ची विजेती झाल्यानंतर रुबिनाला आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.