कोकणची चेडवा पडली प्रेमात; ‘कोकण हार्टेड गर्ल’ने दिली प्रेमाची कबुली
Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर.... अंकिताने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. अशातच अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या लग्नाविषयी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
1 / 5
बिग बॉस मराठीचा नवा सिझन सुरु झाला आहे. यात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर हिने देखील एन्ट्री केली आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर 'कोकण हार्टेड गर्ल'ने एक पोस्ट शेअर केलीय. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आलीय.
2 / 5
अंकिताने एक पोस्ट शेअर केलीय. यात तिने तिच्या लग्नाविषयी बोलती झालीय. रात्री 2 वाजता यशस्वी भव: हे गिफ्ट घेऊन येणं रोमँटिक समजू की काळजी? कारण बिग बॉसमध्ये जाण्यासाठी 2 दिवस बाकी उरलेत फक्त.., असं अंकिता म्हणाली आहे.
3 / 5
खरंतर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस. तुझे शब्द माझी ताकद आहेत, असं अंकिता म्हणाली.
4 / 5
तू हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस, हे बघून आई पण निश्चिंत आहे. तुझी सगळी वाक्य लक्षात ठेऊन या नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. जेव्हा लग्न करु अस आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली. माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास, माझा विचार नको करूस , मी आजही आहे , उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा..., असं अंकिताने पोस्टमध्ये म्हटलंय.
5 / 5
लवकर ये पण जिंकुन ये,आलीस की लग्न करु फक्त जशी आहेस तशीच वाग,जिंकण्यासाठी फेक वागू नकोस, हरलीस तरी चालेल.. हे सगळं लक्षात ठेऊन जातेय. लवकरच येईन पण छान राहुन येईन. तू तयारीला लाग... तुझ्यासोबत 195 देश फिरायचे आहेत. फुलांची खूप आठवण येईल.., अशी पोस्ट अंकिताने शेअर केलीय.