'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरतेय. प्रत्येक दिवशी ही मलिका रंजक वळण घेत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे. या नवरात्र उत्सवात तुळजा आणि सूर्या आणखी जवळ येताना दिसत आहेत. त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होताना दिसतेय.
तुळजाच्या आग्रहामुळे दादा तुळजासोबत दांडिया खेळायला तयार होतो. राजश्रीवर दांडियाच्या ठिकाणी देवीच्या दागिन्यांच्या चोरीचा आळ घेतला जातो. सूर्या आणि प्रसाद तो आळ खोडून काढतात. सूर्या आणि तुळजा दांडिया स्पर्धा जिंकतात.
सिद्धार्थला त्याने केलेल्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी त्याला माझ्या समोर आण, असं तुळजा सूर्याला सांगते. दसऱ्याच्या दिवशी सूर्या सिद्धार्थला तुळजाच्या पायाशी आणून टाकणार आहे आणि सूर्याच्या हस्ते रावण दहन होणार आहे.
सूर्याला देवीचा आशिर्वाद आहे आणि दादाचा नवरात्रीचा कडक उपवास सुरु आहे. सूर्याला बेशुद्ध करुन त्याला कोंडून ठेवण्याचा कट शत्रू रचतोय. त्यामुळे आता तो स्वतःची सुटका करवून घेऊन पालखीच्या वेळी तिथे कसा पोहोचणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.