एखादी मुलगी सुंदर असेल तर शेकडो मुलं तिच्या मागे धावतात असा समज आहे. मात्र हे सर्वांसोबत घडत नाही. काही मुली सुंदर असूनही अविवाहित राहतात. यामागचे कारण काहीही असो, तर काही मुलींना त्यांच्या सौंदर्यामुळे सहज जोडीदार मिळतो, परंतु एक सुंदर मुलगी खूप चर्चेत आहे आणि त्याचे कारण म्हणजे तिला बॉयफ्रेंड मिळत नाहीये.
डेनिस रोचा या मुलीचं नाव असून ती व्यवसायाने वकील आहे, पण ती अॅडल्ट साइड ओन्ली फॅन्सवर कंटेंट क्रिएटर म्हणूनही काम करते आणि भरपूर पैसे कमावते. डेनिसला सीपीआय हरिकेन या नावानेही ओळखले जाते.
डेनिसला डेटिंगसाठी कोणताही बॉयफ्रेंड सापडत नाही आणि याचे कारण तिची सुंदरता आहे. सुरुवातीला तिचे सौंदर्य पाहून लोक तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा लोकांना कळते की ती व्यवसायाने वकील आहे आणि तिला प्रत्येक बाबतीत खूप समज आहे, तेव्हा लोक तिच्यापासून दूर पळू लागतात.
डेनिस म्हणते की, तिला प्रत्येक बाबतीत परफेक्ट असा बॉयफ्रेंड हवा आहे. विशेषतः ज्ञानाच्या बाबतीत. तिला असा मुलगा हवा आहे, ज्याच्यासोबत ती कोणत्याही विषयावर खुलेपणाने वाद घालू शकेल.
डेनिस तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.