अभिनेत्री प्राजक्ता माळी ही शूटिंगसाठी लंडनला गेली आहे. तिने लंडनमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या लंडनमधील फोटोवर नेटकरी गंमतीशीर कमेंट करत आहेत. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
प्राजक्ताने लंडनमधील फोटो शेअर करताना म्हटलं आहे की इंग्लंड हा तिचा फिरायला मिळालेला १३ वा देश. खात्री आहे, फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर देश मोजत असणार. एक आईबरोबरची दुबई ट्रिप सोडल्यास सगळ्या ट्रिप्स कामानिमित्त किंवा sponsored होत्या, देवाचे किती म्हणून आभार मानू.
हो शुभारंभ..हा शुभारंभ…मंगल बेला आयी. लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु. जवळपास अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन चित्रपटांचं चित्रीकरण करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचा होता.” असं प्राजक्ताने पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे.
प्राजक्ताने सहकलाकारांबरोबरचे फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हृषिकेश जोशी, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्त्ववादी आणि आलोक राजवाडे आहेत.