अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनयासोबतच व्यावसायात देखील आघाडीवर आहे. प्राजक्ताचा ज्वेलरी ब्रँड आहे.
'प्राजक्तराज' हा प्राजक्ताचा ज्लेलरी ब्रँड आहे. यातून ती दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी पारंपरिक ज्वेलरी उपलब्ध करून देते.
प्राजक्तराज बाजारात आल्यापासून प्राजक्ताला एक प्रश्न विचारला जातो की, तुझा आवडता दागिना कोणता? याचं प्राजक्ताने उत्तर दिलं आहे.
तांदळ्या हार आवडत असल्याचं प्राजक्ताने सांगितलं आहे. सिंपल आणि एलिगंट म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर करत चाहत्यांना उत्तर दिलं आहे.
रास रचैया, वृंदावन के गोकुलके वासी... राधा तुमरी दासी, दर्शन को है प्यासी, म्हणत प्राजक्ताने हे खास फोटो शेअर केलेत