अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांचा जन्म 1955 ला पुण्यात झाला होता. लहानपणापासूच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांमध्ये भाग घेऊन त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
1978 साली त्यांनी ‘अरविंद देसाई की अजिब दास्ता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी चक्र, अर्थ, पार्टी, सुर्या, प्रेमाची गोष्ट यांसारख्या अनेक हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं.
रोहिणी यांच्या करिअरमध्ये खरा ट्विस्ट आला तो ‘गांधी’ या चित्रपटामुळे. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटात त्यांनी कस्तुरबा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता.
रोहीणी या भारतातील पहिल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी एका ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपटात काम केलं होतं. यासाठी त्यांना BAFTA या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानित करण्ययात आलं आहे. विशेष उल्लेखणीय बाब म्हणजे त्यांनी तब्बल 150 हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे.
रोहिणी यांनी अनेक मराठी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील आईआजी या त्यांच्या पात्राला विशेष पसंती मिळाली. सध्या त्या सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत आजीची भूमिका साकारत आहेत.