अभिनेत्री सई ताम्हणकर हिने साडी लुकमधील खास फोटोशूट केलं आहे.
सईने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.सईने मिंट ग्रीन कलरची साडी नेसली आहे.
सईचा साडीतील लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकची प्रशंसा केली आहे.
सुंदरा! म्हणत एकाने तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. सुंदर, खुबसुरत, Beautiful अशा कमेंट सईच्या फोटोवर पाहायला मिळत आहेत.
अभिनेता हेमंत ढोमेने सुंदर अशी कमेंट केली आहे. तर वॉव म्हणत निपुण धर्माधिकारीनं सईचं कौतुक केलंय.