माधुरी पवार हे मराठी सिनेसृष्टीतलं अल्पावधीतचं प्रसिध्दीस आलेलं नाव. तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करत असतात.
माधुरी तिच्या नृत्यामधून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. नृत्यासोबतचं अभिनय क्षेत्रामध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे.
काही दिवसांपूर्वी ती 'रानबाजार' या मराठी वेबसिरीजमधून झळकली होती. सध्या ती लंडनमध्ये 'लंडन मिसळ' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे.
माधुरी पवार लंडनमध्ये ही भारतीय वेशभूषेत म्हणजेच साडीत वावरताना दिसत आहे. तिने तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
माधुरी पवार हिच्या लंडनमधील फोटोवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तिचं कौतुक ही मोठ्या प्रमाणात केलं जात आहे.