रानबाराज या सीरीजमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमी तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनय आणि नृत्यामधून माधुरी पवार ही चाहत्यांना आकर्षित करत असते. काही दिवसांपूर्वी ती लंडनमध्ये तिच्या नव्या चित्रपटासाठी गेली होती.
माधुरी पवारच्या लंडनमधील साडीतील फोटोंची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वेळी तिने पांढऱ्या रंगाच्या शार्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
माधुरीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून तिच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
माधुरी पवारचा 'लंडन मिसळ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये ती नव्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे.