पंचायत वेबसिरीजसाठी ‘सचिवजीं’नी किती मानधन घेतलं?
Actor Jitendra Kumar Fees For Panchayat Season 3 : पंचायत या वेबसिरीजचा तिसरा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमधली पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पंचायत या वेबसिरीजमध्ये 'सचिव' ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने किती मानधन घेतलं होतं? वाचा सविस्तर...
1 / 5
पंचायत... ओटीटीवरची प्रसिद्ध वेबसिरीज... ही वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय ठरली. या वेबसिरीजचे दोन भाग प्रदर्शित झाले. या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
2 / 5
आता पंचायत या वेबसिरीजचा तिसरा भाग रिलीज होणार आहे. येत्या 28 मेला हा भाग प्रसारित होणार आहे. पंचायतचे पहिले होन भाग बघितलेल्या प्रेक्षकांना या भागाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
3 / 5
पंचायत वेबसिरीजमध्ये 'सचिवजी' ही भूमिका अभिनेता जितेंद्र कुमार याने साकारली आहे. हे पात्र साकारण्यासाठी जितेंद्रने किती पैसे मानधन म्हणून घेतले होते? हे तुम्हाला माहिती आहे का?
4 / 5
पंचायत वेबसिरीजच्या पहिल्या दोन्ही सिझनसाठी अभिनेता जितेंद्र कुमार याने 50 हजार रुपये प्रति एपिसोड फी घेतली होती. पहिल्या दोन भागात 16 एपिसोड आहेत. दोन्हीचे मिळून 8 लाख रूपये मानधन जितेंद्रने घेतलं.
5 / 5
येत्या 28 मेला प्रसारित होणाऱ्या भागासाठी जितेंद्रने किती मानधन घेतलं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या सिरीजच्या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.