आयुष्यातून निघून गेलेली माणसं…; कुशल बद्रिकेची भावनिक पोस्ट चर्चेत
Kushal Badrike Shared Emotional Post on Instagram : कुशल बद्रिकेची भावनिक पोस्ट चर्चेत; म्हणाला, कधी कधी... 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता कुशल बद्रिके याने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. वाचा सविस्तर...
1 / 5
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. आता कुशल बद्रिके याने एक भावनिक पोस्ट शेअर केलीय. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.
2 / 5
कधी कधी आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत असं वाटत राहतं... पुढे निघून गेलेल्यांना हाक मारुन थांबवावसं वाटतं आणि मागे राहिलेल्यांसाठी इथे सावलीत थोडा वेळ थांबावसं वाटतं. पण हे फक्त आपल्यालाच वाटत असेल तर…?, असं कुशलने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
3 / 5
"एखादं नातं तेंव्हाच टिकतं जेंव्हा त्या नात्यातील दोन्ही व्यक्तींना एकमेकांविषयी समान भावना असतात", म्हणून आपण चालत राहतो एखाद्याची हाक ऐकू येई पर्यंत आणि एखादा कुणीतरी सावलीत वाट बघताना दिसे पर्यंत... असं म्हणत कुशलने ही पोस्ट शेअर केलीय.
4 / 5
अभिनेता संतोष जुवेकर याने कुशलच्या पोस्टवर मग तू थांब बघू जरा मी आलोच 4 एप्रिलनंतर..., अशी कमेंट केलीय. मी थांबलोय संत्या, तू कधीही ये... I promise you, असं कुशलने संतोषच्या कमेंटला उत्तर दिलंय.
5 / 5
कुशल सध्या 'मॅडनेस मचायेंगे' या हिंदी रिअॅलिटीशोमध्ये काम करतोय. सोनी मराठीवरील या कॉमेडी शोमधील त्याच्या कामाचंही प्रचंड कौतुक होतंय. कुशल सोशल मीडियावरही त्याचं मत व्यक्त करत असतो.