‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील ‘राधिका’ आता नव्या रुपात; साकारणार ‘ही’ भूमिका
Actress Anita Date in Indrayani Serial Majhya Navaryachi Bayko : 'राधिका' नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणाक; पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार... अनित दाते नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणता आहे हा कार्यक्रम? वाचा सविस्तर...
1 / 5
मुंबई | 21 मार्च 2024 : अभिनेत्री अनिता दातेला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. या मालिकेतील गृहिणीचं पात्र लोकांना आपलंस वाटलं. या मालिकेनंतर अनिता दातेने काही नाटकांमध्ये, सिनेमांमध्येही काम केलं.
2 / 5
अनिता दाते आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवी मालिका घेऊन अनिता दाते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स मराठीवर इंद्रायणी ही नवी मालिका येत आहे. या मालिकेतून अनिता दाते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
3 / 5
25 मार्चपासून इंद्रायणी ही मालिका कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आनंदी हे पात्र अनिता साकारणार आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे. यात अनिता दिसते आहे.
4 / 5
अनिता तिच्या कंफर्टझोनच्या पलिकडे जात भूमिका निवडते. अनिता दाते म्हटलं की, सिंपल गृहिणीच्या भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यामुळे ही थोडी निगेटिव्ह शेड असणारी भूमिका प्रेक्षकांना आवडणार का? पाहणं महत्वाचं असेल.
5 / 5
अनिता दाते हिने वाळवी, मी वसंतराव... या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. शिवाय माझ्या बायकोचा नवरा हे नाटकही ती करत आहे. अनिता दाते आता नव्या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.