दाक्षिणात्य अभिनेत्री, त्यांच्या कामाची चर्चा आपण सर्वत्र ऐकतो. पण सध्या एका मराठी मुलीची बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत होतेय प्रचंड चर्चा... नुकताच या अभिनेत्रीचा एक सिनेमाही रिलीज झाला आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे, मराठी मुलगी मृणाल ठाकूर... मृणालने बॉलिवूडमध्ये दर्जेदार सिनेमे केले आहेत. तसंच दाक्षिणात्य सिनेमातही ती काम करतेय.
'द फॅमिलीस्टार' हा मृणाल ठाकूरचा दाक्षिणात्य सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता विजय देवरकोंडा यांच्यासोबत मृणाल मोठ्या पडद्यावर झळकळी. या सिनेमातील तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.
सितारामम् हा सिनेमात प्रचंड लोकप्रिय ठरला. दुलकर सलमानसोबच्या या सिनेमा मृणालच्या भूमिकेने सिनेमाला चार चांद लावले. हाय नन्ना हा सिनेमाही गाजला. शिवाय 'कुमकुम भाग्य' या हिंदी टीव्ही मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.
तसंच जर्सी हा बॉलिवूड सिनेमाही मृणालने केला. या सिनेमात तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. लस्ट स्टोरीज 2, लव्ह सोनिया, गुमराह, सुपर 30, तुफान, पिप्पा, या सिनेमातील तिच्या भूमिकांनीही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.