मध्ये-मध्ये मी प्रेमात पडते पण मग…; प्राजक्ता माळीचं रिलेशपशीपबाबतचं मत काय?
Actress Prajkta Mali on Love, Relationship and Marriage : प्रेम, रिलेशनशीप आणि लग्न...; अभिनेत्री प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली? मालिका, सिनेमांमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत व्यक्त झाली. तिने प्रेमाबाबतचं तिचं मत व्यक्त केलं आहे. वाचा...
1 / 5
मुंबई | 17 मार्च 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी... मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक... वेगवेगळ्या विषयांवर ती आपलं ठाम मत मांडते. प्रेम आणि रिलेशनशीप याबाबत प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये आपलं मत मांडलं.
2 / 5
मध्ये-मध्ये मी प्रेमात पडते. पण मग मला कळतं की नाही, नाही, नाही... ही शेवटपर्यंत माझ्यासोबत नसणार आहे. मग मी जरा मागे येते. मी त्याला सांगते की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे आणि मी बाजूला होते, असं प्राजक्ताने सांगितलं.
3 / 5
प्रेम आणि रिलेशनशीपबाबतचं प्राजक्ताचं मत काय? असं प्राजक्ताला विचारण्यात आलं तेव्हा तिने आपलं मत व्यक्त केलं. तसंच तिच्या ब्रेकअपबाबतही तिने स्पष्ट मत मांडलं.
4 / 5
पाच- सहा वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीच्या प्रेमात होते. पण मग मला कळालं की तो माझ्याशी खोटं बोलतोय. ती गोष्ट मला पटली नाही. त्याला मी त्याचे पुरावेही दिले. पण खरं ॲक्सेप्ट करायला हिंमत लागते मात्र त्याने ते केलं नाही. म्हणून आम्ही बाजूला झालो, असं प्राजक्ताने सांगितलं.
5 / 5
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला घराघरात ओळख दिली. याशिवाय हंपी, लकडाऊन, तीन अडकून सीताराम या सिनेमांमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे. रानबाजार ही तिची सिरीजही गाजली. महाराष्ट्राची हास्य जत्रा या रिॲलिटी शोचं ती सूत्रसंचालन करते.