समृद्धी आणि अक्षय केळकर यांचं नातं नेमकं काय?; समृद्धी म्हणाली, तो माझा…
Actress Samruddhi Kelkar on Akshay Kelkar Relationship : अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अक्षय केळकर यांचं नातं नेमकं काय आहे?अक्षय केळकरसोबतच्या नात्यावर समृद्धी केळकर व्यक्त झाली, समृद्धी म्हणाली, तो माझा... अभिनेत्री समृद्धी केळकर नेमकं काय म्हणाली? वाचा...
1 / 5
अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अक्षय केळकर हे दोघेही त्याच्या कामामुळे चर्चेत असतात. पण हे दोघेही आणखी एका गोष्टीमुळे वारंवार चर्चेत असतात. त्याचं कारण म्हणजे या दोघांचं नातं...
2 / 5
सोशल मीडियावर समृद्धी आणि अक्षय या दोघांच्या नात्याबाबत वारंवार चर्चा होत असते. अक्षय आणि समृद्धी हे बहीण-भाऊ आहेत, ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. ते नवरा-बायको आहेत, असं बरंच काही सोशल मीडियावर म्हटलं जातं. यावर अभिनेत्री समृद्धी केळकरने भाष्य केलं आहे.
3 / 5
एका मुलाखतीदरम्यान समृद्धीला अक्षयसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने यावर भाष्य केलं. आधी असे व्हीडिओ बघून मला त्रास व्हायला पण नंतर वाटलं हे नेहमीचंच आहे. बऱ्याच जागी वेगवेगळी नाती वाचायला मिळतात. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असं समृद्धी म्हणाली.
4 / 5
पाच- सहा वर्षे झालं आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. आम्ही चांगले आणि घट्ट मित्र आहोत. त्यामुळे ना आम्ही नवरा-बायको आहोत, ना ही आम्ही बहिण भाऊ आहोत... आम्ही जवळचे मित्र आहोत. त्यांची रमा वेगळी आहे, असं समृद्धी म्हणाली.
5 / 5
'या फुलाला सुगंध मातीचा' ही समृद्धी केळकरची मालिका प्रचंड गाजली. तर अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कलर्स मराठीवरच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेता ठरला. या दोघांनी 'दोन कटिंग' ही सिरीज केली. तेव्हापासूनच या दोघांचं नाव जोडलं जाऊ लागलं. यावर समृद्धीने एका मुलाखतीत भाष्य केलंय.