गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, घाटकोपर, मुंबई | 22 डिसेंबर 2023 : माधुरी दीक्षित... बॉलिवूडमधील आघाडीचं नाव... माधुरी दीक्षितचा अभिनय, माधुरीचा डान्स आणि तिच्या सौंदर्याचे अनेक असंख्य दिवाने आहेत.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशातच या चर्चेला हवा देणारी कृती समोर आली आहे.
मुंबईतील घाटकोपर या भागातील असल्फा या ठिकाणी श्री साई समर्थ भक्त मंडळाच्या वतीने माधुरी दीक्षितला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. याचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
याआधी देखील माधुरी दीक्षित उत्तर मध्य या भागातून लोकसभेसाठी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात होताना दिसते.
मुंबईचा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ खासदार पूनम महाजन यांचा आहे. त्यामुळे या परिसरात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच या बॅनरवर माधुरी दीक्षितचा फोटोचा बॅनरवर फोटो असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.