प्राजक्ता माळी आणि शाहरूख खानची ‘ती’ भेट; जेव्हा 17 वेळा धडकली…
Prajkta Mali 17 Times hit to Shahrukh Khan in Swadesh Movie : प्राजक्ता माळी आणि शाहरूख खानची 'ती' भेट; जेव्हा 17 वेळा धडकली... नमेकं काय घडलं होतं? एका मुलाखती दरम्यान प्राजक्ता माळी हिने हा किस्सा सांगितला. शाहरूखने यावेळी तिला काय सांगितलं? वाचा सविस्तर...
1 / 5
प्राजक्ता माळी ही मराठीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा अभिनय अनेकांना आवडतो.बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सिनेमात प्राजक्ता माळीने छोटा रोल केला. तेव्हा प्राजक्ता माळी तब्बल 17 वेळा शाहरूख खानला धडकली आहे.
2 / 5
स्वदेस या सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा हा किस्सा आहे. सिनेमाची हिरोईन लायब्ररीमध्ये पैसे विसरते. तिला ते पैसे देण्यासाठी सिनेमाचा हिरो शाहरूख खान बाहेर येतो. तेव्हा त्याला कळतं की हिरोईन तर गेली आहे. यावेळी त्याला दोन मुली धडकतात. त्या दोन पैकी प्राजक्ता माळी आहे.
3 / 5
शाहरूख खान माझ्या समोर आहे. माझं वय फक्त 13 वर्षे होतं. तेव्हा शाहरूख खान आला की मी बाजूला व्हायचे आणि त्याला हिरोईन दिसायची. पण त्याला हिरोईन दिसू नये म्हणू आम्ही त्याला आम्ही धडकतो. पण तसं होत नव्हतं. मी बाजूला व्हायचे, असं प्राजक्ताने सांगितलं.
4 / 5
शाहरूखने मला पकडलं आणि सांगितलं, तू सरळ चालत ये. बाकी तुला काहीच करायचं नाहीये. तू फक्त बाजूला होऊ नकोस. तेव्हा मी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले होते. तेव्हा आम्ही 18 वा टेक दिला आणि तो ओके झाला, हा किस्सा प्राजक्ताने एका मुलाखतीदरम्यान सांगितला.
5 / 5
प्राजक्ता माळी ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. हास्य जत्रा या रिअॅलिटी शोचं ती सूत्रसंचालन करते. लकडाऊन,चंद्रमुखी, हंपी, पावनखिंड या सिनेमांमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे. तर जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने प्राजक्ताला ओळख दिली.