रिंकू राजगुरुचं डाएट प्लॅन काय आहे? फिट राहण्यासाठी काय करते?
Marathi Actress Rinku Rajguru Diet Plan and Favorite Food : अभिनेत्री म्हटलं की स्ट्रिक डाएट करत असावी, असा समज असतो. पण अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटते. तिचं डाएट प्लॅन कसं असतं? तिला कोणते पदार्थ खायला आवडतात? वाचा सविस्तर....
1 / 5
मुंबई | 18 मार्च 2024 : रिंकू राजगुरु... सैराट सिनेमामध्ये रिंकू राजगुरु हिने साकारलेल्या आर्चीने महाराष्ट्राला वेड लावलं. सैराटमध्ये दिसलेली आर्ची आणि आताची अभिनेत्री रिंकू राजगुरु यात खूप फरक आहे.
2 / 5
रिंकूच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल झाला आहे. त्यामुळे रिंकूचं डाएट आणि तिची लाईफस्टाईल कशी आहे? याबाबत लोकांना उत्सुकता असते. तिच्याबाबत जाणून घ्यायला लोकांना आवडतं.
3 / 5
तर रिंकू राजगुरु सिंपल डाएट करते. तिची आईच तिची डाएट प्लॅनर आहे. आई सांगेन ते पदार्थ रिंकू खाते. घरातील पदार्थ खायला तिला आवडतं. शक्यतो बाहेरचं खाणं रिंकू टाळते.
4 / 5
आईच्या हातची पुरणपोळी रिंकूला प्रचंड आवडते. रिंकूलाही पुरण बनवता येतं. बाहेर मैत्रिणींसोबतच बाहेर गेले तरी त्या पिझ्झा वगैरे खातात. पण मला ते आवडत नाही. मी फार- फार तर भेळ खाऊ शकते. ती मी मनापासून खाते, असं रिंकूने एका मुलाखतीत सांगितलं.
5 / 5
घरी गेले तर आधीचे दोन दिवस मी खूप खाते. हे खायचंय ते खायचंय... पण नंतर मी घरी खूप कमी खाते. एखादा पदार्थ आवडला तर त्याचा एखादा घासही मला बास होतो. सकाळी नाश्ता करते. दुपारी मग जीमला जाते. मग ताक वगैरे पिते. संध्याकाळी काकडी गाजर वगैरे खाते. बाहेरचं फार काही खायला आवडत नाही, असं रिंकूने सांगितलं.