आर्ची आणि परशा पुन्हा एकत्र दिसणार?; रिंकू राजगुरू म्हणाली, आम्ही दोघे…
Actress Rinku Rajguru on Work With Actor Akash Thosar : सैराट सिनेमामधील प्रसिद्ध जोडी आर्ची- परशा अर्थात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र दिसणार?; अभिनेत्री रिंकू राजगुरू काय म्हणाली? ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकत्र कधी पाहायला मिळणार? वाचा सविस्तर...
1 / 5
मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : सैराट... मराठीतील सुपटहिट सिनेमा... हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर बाहेर तुडुंब गर्दी केली होती. या सिनेमाला या सिनेमातील कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
2 / 5
सैराटमधील आर्ची आणि परशा या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. हे दोघं जिथं जातात तिथं लोक गर्दी करतात. ही जोडी आम्हाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळावी, अशी अपेक्षा सिनेरसिक व्यक्त करत असतात.
3 / 5
आर्चीचं पात्र साकारलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि परशा हे पात्र साकारलेला अभिनेता आकाश ठोसर हे दोघे पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार? यावर रिंकूने सविस्तर प्रतिक्रिया दिली.
4 / 5
आम्ही जिथं जातो तिथं आम्हाला एक प्रश्न विचारला जातो तू आणि आकाश पुन्हा कधी एकत्र दिसणार? तर आम्हालाही दोघांना एकमेकांसोबत काम करायचं आहे. चांगल्या स्क्रिप्टची आम्ही दोघं वाट बघत आहोत. चांगली स्क्रिप्ट मिळाली तर लवकरच आम्ही दोघं एकत्र काम करू, असं रिंकू म्हणाली.
5 / 5
काही दिवसांआधी बॉलिवूड अभिनेता आमीर खानची लेक आयरा विवाह झाला. या लग्नसोहळ्याला रिंकू आणि आकाश गेले होते. या कार्यक्रमामधील खास फोटो या दोघांनी शेअर केले. ते हे खास फोटो...