रिंकू राजगुरु रिलेशनशीपमध्ये आहे का?; प्रेमाबाबत तिचं मत काय?
Sairat Fame Actress Rinku Rajguru On Relationship : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूबाबत तिच्या चाहत्यांना प्रचंड कुतुहल आहे. तिच्या बाबत जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. रिंकू राजगुरूचं रिलेशनशीप स्टेटस काय? तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर...
1 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने साकारलेली आर्ची या भूमिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. आर्ची, तिचे डायलॉग आणि तिचा अभिनय लोकांच्या मनात आजही घर करून आहे. रिंकूचं नाव जरी घेतलं तरी 'आर्ची' डोळ्यासमोर उभी राहते.
2 / 5
सैराट या सिनेमाला रिलीज होऊन आठ वर्षे पूर्ण झालीत. तरी या सिनेमाविषयी या सिनेमातील कलाकारांविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतुहल आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरु एका मुलाखतीदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्यावर व्यक्त झाली.
3 / 5
तू रिलेशनशीपमध्ये आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मी अजून बरंच काही शिकते आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यापासून फार लांब आहेत. मी आता रिलेशनशीपमध्ये नाही, असं रिंकूने सांगितलं.
4 / 5
तुझं प्रेमाबाबत मत काय आहे? तुला कसा जोडीदार हवा आहे? असं विचारण्यात आलं. तेव्हा रिंकूने त्यावर उत्तर दिलं. माझं असं अजितबातच मत नाही की तो दिसायला फार हँडसम असावा. पण तो आतून चांगला असावा. मनाने सुंदर असावा, असं रिंकू म्हणाली.
5 / 5
जोडीदार हा समजून घेणारा असावा. अडी-अडचणीला साथ देणारा असावा. काही संकट आलं तर तो पाठिशी खंबीरपणे उभा असावा, असं रिंकू म्हणाली. एका मुलाखती दरम्यान रिंकूने हे मत मांडलं आहे. रिंकू राजगुरुला सैराट सिनेमाने ओळख दिली. यानंतरही रिंकूने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे.