आई-बाबांनी मला एकटीलाच….; सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांची लेकीने सांगितला ‘तो’ किस्सा

| Updated on: Apr 09, 2024 | 7:59 AM

Supriya And Sachin Pilgaonkar's Daughter Shriya Pilgaonkar About Her Childhood Memories : अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांची लेक श्रियाने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाली, आई-बाबांनी मला एकटीला… नेमका काय आहे हा किस्सा? वाचा सविस्तर...

1 / 5
अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रीया पिळगावकर हिने एका मुलाखतीदरम्यान एक किस्सा सांगितला. बालपणीचा एक किस्सा श्रीयाने सांगितला आहे.

2 / 5
माझे बाबा माझ्या सेफ्टीची कायमच काळजी घेतात. पण माझी आई धाडसी आहे. पाचवीत असताना माझ्या आईने मला एकटीला प्रवास करायला लावला, असं श्रीया एका मुलाखतीत म्हणाली.

3 / 5
मुंबईतून तिने मला शताब्दी एक्सप्रेसमध्ये बसवलं आणि पुण्याला पाठवलं.म्हणाली, ट्रेनमध्ये लोकांशी फार काही बोलू नको... पण आता लोक सोबत होते. तर मी त्यांच्याशी बोलले, असं श्रीयाने सांगितलं.

4 / 5
पुण्याला पोहोचल्यावर माझी मावशी मला न्यायला आली. मावशी मला ट्रेनमध्ये शोधत होती. पण तोवर मी स्टेशनला उतरले होते. मग मी तिच्यासोबत घरी गेले. तेव्हा माझ्याकडे फोन वगैरे काहीही नव्हतं. पण तरी मी एकटी गेले होते, असं ती म्हणाली.

5 / 5
बाबा हे बाबा आहेत. त्यामुळे ते कायम मी सुरक्षित कशी राहील याची काळजी घेतात. पण आईने मला कायम चौकटीच्या पलिकडे जायला शिकवलं. तिने मला कायम धाडस करायला प्रोत्साहित केलं, असं श्रीयाने सांगितलं.