माझी तुझी रेशीमगाठसाठी मायराची निवड कशी झाली?; प्रचंड रंजक किस्सा आहे….
Myra Vaikul How To Selected For Majhi Tujhi Reshimgath as a Pari : झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आठवते का? या मालिकेतील छोटी परी जिने प्रेक्षकांना आजही आठवते. परी ही भूमिका साकारली होती बाल कलाकार मायरा वायकूळने, तिला ही भूमिका कशी मिळाली? वाचा सविस्तर...
1 / 5
माझी तुझी रेशीमगाठ... झी मराठीवरील ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. नेहा आणि तिची लेक परी आणि यश या तिघांची केमेस्ट्री लोकांना प्रचंड लोकप्रिय ठरली. चिमुकल्या परीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
2 / 5
परीचं बोलणं, तिचं बिंधास बागडणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. बालकलाकार मायरा वायकुळ हिने परीची भूमिका साकारली. पण या मालिकेसाठी मायरा निवड कशी झाली?
3 / 5
एका मुलाखती दरम्यान मायराचे बाबा गौरव वायकुळ यांनी यावर भाष्य केलं. आम्ही कधीच असं ठरवलं नव्हतं की आपण व्हीडिओ करू मग त्यातून तिची निवड होईल आणि मग ती या क्षेत्रात येईल, असं कधी वाटलं नव्हतं, असं गौरव वायकुळ म्हणाले.
4 / 5
मायराचं इन्स्टाग्राम आकाऊंट होतं. त्यावर आम्ही तिचे व्हीडिओ पोस्ट करत होतो. तिथे आम्हाला झी मराठीकडून मेसेज आला. तुम्ही या नंबरवर संपर्क साधा. असं सांगितलं. पण मला वाटलं हे फेक असावं. म्हणून आधी मी त मेसेज टाळला, असं गौरव वायकुळ म्हणाले.
5 / 5
मग नंतर त्या नंबरवर फोन केला. तर त्यांनी ऑफिसला बोलावलं. मायराला विचारलं की कॅमेरा लावून शूट केलं तर चालेल का? तिने होकार दिला. त्यानंतर मग शुटिंग सुरु झालं, असं गौरव यांनी सांगितलं. त्यानंतर मायराने हिंदी टीव्ही मालिकेतही काम केलं. 'नाच गं घुमा' हा तिचा सिनेमाही नुकतंच प्रदर्शित झालाय.