मालिका संपल्यानंतर आता…; ‘आई कुठे काय करते’ मधुराणी प्रभुलकरच्या फोटोवर नेटकऱ्यांची कमेंट

| Updated on: Dec 11, 2024 | 2:29 PM

Actress Madhurani Prabhulkar Photos : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आताही तिने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी...

1 / 5
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यानंतर काही दिवसांआधी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

2 / 5
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली. मधुराणीने साकारलेली आई प्रेक्षकांच्या मनात रुंजी घातले. मधुराणीच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे.

3 / 5
मधुराणीने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. मोरपंखी रंगाच्या साडीतील मधुराणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

4 / 5
खूपच सुंदर दिसतीयेस, या साडीत फ्रेश दिसतीये, अशी कमेंट तिच्या चाहतीने केली आहे. 'ती सिरीयल' बंद झाल्यामुळे आत्ता किती आनंदी दिसत आहात, असंही एका चाहत्याने म्हटलं आहे.

5 / 5
 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मधुराणी भावूक झाली होती. आई कुठे काय करते चा प्रवास आज थांबला... पण तो संपला नाही... कारण आई हे तत्व आहे... ते कसं संपेल, असं मुधराणी म्हणाली होती.