दोन प्लेट भडंग पार्सल कर…; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
Netizens on Sai Tamhankar Post : अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतंच तिचा कपड्यांचा ब्रान्ड लॉन्च केला आहे. तिने याबाबतची खास पोस्ट शेअर केलीय. सईच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय. सईच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी खास कमेंट केल्या आहेत. वाचा सविस्तर...
1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या वाढिवसाच्या निमित्त तिचा नवा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे. 'मॅडम एस' हा Merchandise ब्रँड लाँच केला आहे. तिच्या या नव्या बिझनेसची प्रचंड चर्चा आहे.
2 / 5
तुम्ही तुमचा आवडीचा टी- शर्ट खरेदी केला की नाही? असं म्हणत सईने हे खास फोटो शेअर केलेत. सईच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती तर दिली. पण यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत
3 / 5
सईच्या या टी- शर्टवर 'घ्या भडंग!', असा मजकूर लिहिलेला आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. भोरे भडंग... सांगलीचा. कसा दिला भडंग? अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. भडंग कसा प्लेट आहे? 2पार्सल पाठव, अशी कमेंट सईच्या चाहत्याने केली आहे.
4 / 5
'मॅडम एस' हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्स साठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करण यासारखा दुसरा मुहूर्त नाही. म्हणून फॅन्ससाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे, असं सईने तिच्या या नव्या ब्रँडविषयी म्हटलं आहे.
5 / 5
'ग्राउंड झिरो' 'अग्नी' सारखे दोन उत्तम चित्रपट सईने केले आहेत. आता 'मटका किंग' सारखी वेब सीरिज सई करत आहे. 'डब्बा कार्टेल' या वेब सीरिजमध्ये सुद्धा सई दिसणार आहे.