मुकेश अंबानी यांच्या मुलांना शाळेत असताना मिळणारा पॉकेट मनीचा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का लागेल
Anant Ambani School Pocket Money | अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांना शाळेत असताना किती पॉकेट मनी मिळायचा? आकडा समजल्यावर तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही.
1 / 7
जगातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी यांचं नावं आघाडीवर आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी यांनी त्यांच्या मुलांना लाडात वाढवलं.
2 / 7
मुकेश अंबानी आणि निता अंबानी आपल्या मुलांना पॉकेट मनी म्हणून जितकी रक्कम द्यायचे, तो आकडा ऐकल्यावर तुमचा तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही.
3 / 7
श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले अंबानी आपल्या मुलांना पॉकेट मनी म्हणून खूप रक्कम देत असतील, असा प्रत्येकाचा समज आहे. मात्र तसं नाही. "मी मुलांना दररोज पॉकेट मनी म्हणून 5 रुपये द्यायचे", असं निता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
4 / 7
मुलांना पैशांची किंमत कळावी, यासाठी निता अंबानी या मुलांना दररोज फक्त 5 रुपये द्यायच्या. तुम्हालाही हा आकडा ऐकून विश्वास बसला नसेल.
5 / 7
निता अंबानी यांनी या मुलाखतीदरम्यान एक विनोदी किस्सा सांगितला. मुकेश आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्याबाबतचा हा किस्सा आहे. अनंतने तेव्हा बेडरुममध्ये येऊन 5 ऐवजी 10 रुपये पॉकेट मनीसाठी मागितले होते.
6 / 7
"अनंत बेड रुमजवळ आला आणि 10 रुपये मागू लागला. मी अनंतला जास्त पैसे का मागतोय असं विचारलं. तेव्हा अनंत म्हणाला की मी शाळेत खिशातून 5 रुपये काढतो तेव्हा मित्र माझ्यावर हसतात आणि म्हणतात की तु अंबानी आहेस की भिकारी", असं निता यांनी मुलाखतीत सांगितलं आणि हसू लागल्या.
7 / 7
या मुलाखतीत निता अंबानी यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. "मला घरी मदतीसाठी असलेला कर्मचारी वर्ग हा मॅम न बोलता भाभी असं म्हणतात", असं निता अंबानी यांनी सांगितलं.