अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मेला साखरपुडा झाला. या साखरपुड्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली.
साखरपुड्याचे फोटो या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते. परिणीती चोप्राने आता काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
परिणीती यातल्या एका फोटोमध्ये रडताना दिसतेय. तर राघव तिचे अश्रू पुसताना दिसत आहेत.
परिणीतीने आपल्या कुटुंबासोबतचेही फोटो शेअर केले आहेत. परिणीतीने तिच्या भावंडासोबतहीचेही फोटो शेअर केले आहेत.
परिणीतीची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राने राघव चड्ढा यांचं औक्षण केलं. त्याचा फोटो परिणीतीने सोशल मीडियावर शेअर केलाय.