संदिप खरेंच्या मुलीचं मनमोहक सौंदर्य; ‘या’ मालिकेत साकारतेय भूमिका
Sandeep Khare Daughter Roomani Khare Photos : कवी संदीप खरे यांची लेक रूमाणी मराठी सिनेसृष्टीत काम करत आहे. ती सध्या एका मालिकेत झळकते आहे. याआधीही रूमाणीने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. रूमाणीची सध्याची मालिकाही चांगलीच गाजते आहे. पाहा खास फोटो...
1 / 5
प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या कविता, त्यांची गाणी याचा मोठा चाहतावर्ग आहे. संदीप खरेंच्या कविता ऐकताना मनात भावना दाटून येतात. तर त्यांची गाणी मंत्रमुग्ध करतात. संदीप खरे यांची मुलगी ही सिनेसृष्टीत काम करतेय.
2 / 5
प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची लेक रूमाणी खरे ही देखील सिनसृष्टीत काम करत आहे. कलर्स मराठीवरील 'दुर्गा' या मालिकेत झळकतेय. या मालिकेत तिने एक पत्रकार तरूणीचं पात्र साकारलं आहे.
3 / 5
अभिनेता अंबर गनपुळे आणि रूमाणी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. या दोघांची जोडीही प्रेक्षकांना आवडते आहे. मालिकेत लग्नाचा सिक्वेल सुरु आहे. मोहिते पॅलेसमध्ये दुर्गा आणि अभिषेकचा विवाह सोहळा पार पडला.
4 / 5
'तू तेव्हा तशी' या मालिकेतही रूमाणीने काम केलं आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकरची मुलीचं पात्र रूमाणीने साकारलं होतं. स्वप्नील जोशीसोबतची या मालिकेतील तिची केमेस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती.
5 / 5
रूमानी खरे हिने मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसतं. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या पोस्टला नेटकरी पसंती देत असतात.