‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट परवा रिलीज झाला. हा सिनेमा तिकीटबारीवर चांगलीच कमाई करताना दिसतोय.
दोन दिवसात या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दोनच दिवसात या सिनेमाने शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.
ट्रेड एनालिस्ट मनोबला विजयबालन ट्विट करत ही माहिती दिली आहे. "राधे-श्यामने दोन दिवसात शंभर कोटी कमावले आहेत", असं ट्विट त्यांनी केलं आहे.
राधे श्याम सिनेमात प्रभास ज्योतिषाच्या भूमिकेत आहे. तर पूजा हेगडे म्युझिक टिचर आहे. या दोघांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' सध्या सिनेरसिकांच्या मनावर रूंजी घालतेय.
प्रभासने बाहुबली, साहो,महापुरूष अश्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रभास अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘के’ चित्रपटातही पहायला मिळणार आहे.