आज बाबा असते तर…; प्राजक्ताने साकारलेली ‘फुलंवती’ पाहून प्रसाद पुरंदरे यांची प्रतिक्रिया
Prasad Purandare on Phulwanti Movie : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कथेवर आधारित 'फुलवंती' हा सिनेमा पाहिल्यानंतर पुरंदरेंचे पुत्र प्रसाद पुरंदरे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत प्राजक्ता माळीने पोस्ट लिहिली आहे. वाचा सविस्तर बातमी...
1 / 5
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा 'फुलवंती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलग पाच आठवडे हा सिनेमा चित्रपटगृहात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
2 / 5
'फुलवंती' हा सिनेमा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'फुलवंती' कादंबरीवर आधारित आहे. भारतभर किर्ती असलेल्या नर्तिकेच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे.
3 / 5
बाबासाहेब पुरंदरे यांचे पुत्र प्रसाद पुरंदरे यांच्या पुण्यातील ‘सकल ललित कलाघर’मध्ये फुलवंतीचा 'स्पेशल शो' आयोजित करण्यात आला. संपुर्ण कुटूंबाबरोबर परत चित्रपट पाहायचाच होता. सगळे घरचे जमले. पहिल्यांदा निव्वळ प्रेक्षक म्हणून चित्रपट पाहू शकले, असं म्हणत प्राजक्ताने या स्क्रिनिंगचे फोटो शेअर केलेत.
4 / 5
आज बाबा असायला हवे होते, त्यांना फार आनंद झाला असता. तू बाबांच्या कथेला पुर्ण न्याय दिलास, असं प्रसाद सर म्हणाले. हे ऐकून खूप बरं वाटलं, असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
5 / 5
मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘फुलवंती’सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकतो आहे. ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी आहे.