रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तळेगाव दाभाडेमधल्या घरी त्यांचा मृतदेह आढळला आहे.
रवींद्र महाजन यांचे अनेक सिनेमे गाजले. झुंज, आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ, देवता, बेलभंडार, मुंबईचा फौजदार या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या.
अलिकडच्या काळातील पानीपत, कॅरी ऑन मराठा, काय राव तुम्ही, देऊळबंद या सिनेमांमध्ये रवींद्र महाजनी यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
'सत्तेसाठी काहीही' या सिनेमाची निर्मितीही त्यांनी केली आहे. कसदार अभिनय आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी या गुणांमुळे रवींद्र महाजनी यांची सिनेसृष्टीवरील छाप कायम आहे.